ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात; महापालिकेच्या कारभाराचेही काढले वाभाडे!

मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde) महापालिकेत दडपशाही, हुकूमशाही सुरु असून अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. पालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी ५ हजार कोटींची घोषणा केली होती. पण, मर्जीतील लोकांना टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?, असा सवाल शिवसेना नेते आणि माजी मंत्री महापालिकेती कारभारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

पुढे ठाकरे म्हणाले, “१ ऑक्टोंबर ते १ जून मध्ये मुंबईतील रस्त्यांची काम केली जातात. पण आता टेंडर रद्द करण्यात आल्याने, येत्या पावसाळ्यात जर मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, तर याला घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालिकेचे प्रशासन जबाबदार राहिल,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“पालिकेत चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या ९० दिवसांत ६ बदल्या करण्यात आल्या. काहींची तर २४ तासांत बदली केली गेली. प्रशासनात इतक्या तडकाफडली बदल्या होत नाही. एवढा गोंधळ का होतोय? कोणाच्या आदेशाने हे सुरु आहे?,” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये