ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

तेजस्वी यादव यांच्या बिहार भेटीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले; ‘आम्ही लंबे रेसचे…’;

पाटना : (Aaditya Thackeray On Tejashwi Yadav) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. अनेक मोठे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर शिवसेना नवसंजीवणी देण्यासाठी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर आज त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जावून भेट घेतली. दोन युवा नेते एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलं असून भेटीवर आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केलं.

आदित्य ठाकरे म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्यासोबत आधीपासून चर्चा सुरू होती. कोरोनाच्या काळात भेट होऊ शकली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या सरकारचे काम चांगलं सुरू आहे. बिहारमध्ये विकास दिसून येतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील जो युवक देशासाठी काम करू इच्छितो, रोजगार निर्माण करू इच्छितो, महागाईविरुद्ध काम करू इच्छितो हे सगळे एकत्र आले तर देशात काही तरी चांगल करता येईल, असं आदित्य यांनी म्हटलं.

आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. पर्यावरण, उद्योग, विकासावर चर्चा झाली. राजकारणाची चर्चा झाली नाही. दोन्ही कुटुंबाचे संबंध कायमच चांगले आहेत. ही मैत्री पुढेही चालत राहिलं. तेजस्वी यांना मुंबईला येण्याचं आमंत्रण दिल्याचं आदित्य यांनी म्हटलं. युवक नेत्याचं नेतृत्व कोण करणार, यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, दरवेळी राजकारण करणं गरजेचं नाही. तेजस्वी यादव चांगलं काम करत आहे. आम्ही लंबे रेसचे घोडे आहोत, असंही आदित्य यांनी नमूद केलं. तर आमचं पहिलं उद्दीष्ट लोकशाही वाचविण्याचं असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये