ताज्या बातम्यामनोरंजन

एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिकच्या मैत्रीत फुट? स्वत: अब्दुने केला खुलासा; म्हणाला, “मला मनस्ताप होत आहे…”

मुंबई | Abdu Rozik – यंदाचं ‘बिग बाॅस 16’वं (Bigg Boss 16) पर्व चांगलंच गाजलं. या पर्वाचा विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं आपल्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच बिग बाॅसच्या घरात चर्चेत राहिली ती ‘मंडली’ची मैत्री. त्यांच्या या मैत्रीला प्रेक्षकांनी भरूभरून प्रेम दिलं आहे. हा शो संपल्यानंतरही हे सर्वजण एकमेकांना भेटल्याचं दिसले. अशातच आता अब्दुल रोझिक (Abdu Rozik) आणि एमसी स्टॅन यांच्या मैत्रीत फूट पडल्याची माहिती समोर आली आहे.

मंडलीमध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare), एमसी स्टॅन, अब्दु रोझिक, निमृत कौर (Nimrit Kaur), साजिद खान (Sajid Khan), सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqueer Khan) हे सहाजण होते. पण आता स्टॅन अब्दूशी बोलत नसल्याचं समोर आलंय. याबाबतचा खुलासा स्वत: अब्दुने एका व्हिडीओमधून केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये अब्दूनं म्हटलं आहे की, “23 मिलियन व्ह्यूज माझ्या गाण्याला मिळाले आहेत. त्यामुळे माझ्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी मी एमसी स्टॅनला विचारण्याची गरज नाही. मी जेव्हाही एमसी स्टॅनला कॉल करतो तेव्हा तो हाय किंवा सलाम म्हणत नाही, तो डायरेक्ट कॉल डिस्कनेक्ट करतो. प्रत्येकजण मला एमसी स्टॅनबद्दल विचारत आहे. मी त्याच्याबद्दल कधी वाईट बोलेन असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा बिग बॉसच्या घरात तो दु:खी असायचा, तेव्हा प्रत्येक वेळी मी त्याच्याबरोबर होतो. पण आता तो मीडियात म्हणत फिरतोय की मी त्याला माझ्या गाण्याचं प्रमोशन करायला सांगितलं. असं का करतोय तो, मला त्याचा मनस्ताप होत आहे. मी मीडियामध्ये बातम्या पाहिल्यापासून मला राग आला आहे.”

दरम्यान, नुकतंच शिव ठाकरेनं एक पार्टी आयोजित करून त्या सर्वांची मैत्री कायम असल्याचं त्यानं सांगितलं होतं. या पार्टीमध्ये अब्दू, प्रतिक सहजपाल, साजिद खान, सुंबुल, सौंदर्या शर्मा, शिल्पा शिंदे, विशाल कोटियन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये