शिंदे गटात फुट? “…म्हणून आमच्याच नेत्याचा माझ्याविरोधात कट” शिंदे गटातील सत्तारांच्या दाव्याने खळबळ

औरंगाबाद : (Abdul Sattar On Sanjay Shirsat) सहा महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत, भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. शिंदे याच्या गटात सामील झालेल्या 40 आमदारांमधील वाद आता हळुहळु चव्हाट्यावर येताना दिसत आहे. त्यातच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांनी राज्याच्या राजकारण पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील एका नेत्याकडूनच माझ्याविरोधात कट रचला जात आहे. त्यांनी जरी कोणत्या नेत्याचे नाव घेतले नसले तरी, त्यांचा अप्रत्यक्ष संजय शिरसाट यांच्याकडे रोष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं शिंदे गटातच अंतर्गत धुसफुस आणि कुरघोडीचं राजकारण यानिमित्तानं समोर येताना दिसत आहे.
कथीत टीईटी घोटाळा प्रकरण मी मंत्री असतानाचं बाहेर का आलंय? यामागे माझ्या पक्षातील लोक असतील, माझे हितचिंतक असतील किंवा विरोधीपक्षातील ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलई खात होते ते ही असतील. माझ्याविरोधात जी बातमी आली त्यावर मला शंका आली की मुख्यमंत्र्यांच्या घरात आमची जी चर्चा झाली ती बाहेर मीडियापर्यंत आली. मग मी मुख्यमंत्र्यांना याची तक्रार दिली की आपल्या चर्चेतील गोष्टी बाहेर कशा जातात? पण याबद्दल मी बोलणार नाही. पण तो नेता महाराष्ट्रातील आहे.
सत्तारांच्या या आरोपांवर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, “पहिल्यांदा त्यांना जे काही मंत्रीपद दिलेलं आहे ते मुख्यमंत्री शिंदेंनी केलेलं आहे. त्याचं काम ते करत आहेत. ते काम करतात म्हणजे छोट्यामोठ्या चुका होत असतात. पण त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. आम्ही मंत्रीपदाच्या रांगेत आहोत पण आम्ही कधी काही बोलतोय का? आमच्यासारखी मंडळी समजून घेऊन चाललेले आहेत”