शिवसेनेचा कोणताही वाण; शिंदेंच्या बाणापुढं टिकणार नाही – अब्दुल सत्तार

मुंबई : (Abdul Sattar On Shivsena) शुक्रवार दि. १५ रोजी सिल्लोड मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदरांच्या सत्काराचं आयोजन मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर इथं केलं होतं. शिंदे यांच सरकार स्थापन झाल्यावर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान सत्तार म्हणाले, भविष्यात जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही, असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. रात्री दोन वाजता शिंदे यांनी माझ्या नगपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळं मी त्यांचे उपकार विसरणार नाही. मागील मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या,पण आता ती अडचण शिंदे यांनी सोडवली आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही. आत्तापर्यंत लेना बँका बघितल्या पण महाराष्ट्रातील देना बँक म्हणजे शिंदे साहेब. असं म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
माझ्या मतदारसंघात हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त आहे पण ते मला गेली अनेक वर्षे निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही. असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लावला आहे. ज्याला काही अक्कल नाही तेही नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढं चालवण्यासाठी घेतला आहे असं यावेळी सत्तार म्हणाले.