ताज्या बातम्यारणधुमाळी

“आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार…”, अब्दुल सत्तारांचा खळबळजनक दावा

परभणी | Abdul Sattar On Uddhav Thackeray – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात (Shinde Group) येणार आहेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. ते परभणी येथील जाहीर सभेत बोलत होते. मात्र, सत्तारांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल (24 सप्टेंबर) ते परभणीत होते. यावेळी त्यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता, सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचं निवेदनही स्वीकारलं.

अब्दुल सत्तार जाहीर सभेत बोलताना म्हणाले, “आम्ही 40 आमदार अधिक दहा, त्यात पाच आमदार आणखी येणार आहेत. पहिले दहा खासदार होते नंतर 12 खासदार झाले आता 13 झाले. दोन-तीन आणखी येणार आहेत. तरी हे लोक असली-नकली सांगताय, मग हे येणारे काय वेडे आहेत का? आता गल्ली-बोळात फिरत आहेत, अगोदरच फिरले असते तर ही वेळ आली असती का?”, असा सवालही त्यांनी केला आहे.

“हे कशामुळं झालं, घरात बसल्यामुळं झालं. आज तुमची मैदानात उतरण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवण्याचे स्वप्न पाहत आहात, मग अडीच वर्षे काय केलं? मुख्यमंत्री हे छोटं पद नाही, ते किती मोठं आणि शक्तीशाली असतं याचा अंदाज मी लावू शकतो. ज्यावेळी होता त्यावेळी काही दिलं नाही, आता नाहीत तर काय देणार? तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही”, असा टोलाही सत्तारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांचं नाव न घेता लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये