क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘समृद्धी’वर पुन्हा मृत्यूचं तांडव! १७ कामगार दगावले; मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश

पालघर : (Accident on Samriddhi Highway) समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सपळा बनत चालला आहे. २२ प्रवाशांच्या अपघातीची जखम ताजी असतानाच आता आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना शहापूर येथे ग्रेडर व लाँचर क्रेन कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे 1 वाजण्याच्या सुमारात घडली आहे. ३ कामगार जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहापूरजवळ समृद्धी एक्सप्रेसचं काम सुरू होतं, त्यावेळी गर्डर कोसळून १७ लोकांचा मृत्यू झाला. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि त्या खात्याचे मंत्रिदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरु आहे. मृत्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली आहे तर, जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये