ताज्या बातम्या

त्याची ही दिवाळी अखेरची ठरली; समृद्धी मार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : ऐन दिवाळीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी पुण्याहून गावी जात असणाऱ्या काही जणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व वर्धा येथील रहिवासी आहेत.

नेमकं काय घडलं ?

दिवाळी सण असल्याने पुण्याहून चार तरुण हे समृद्धी मार्गाने वर्धा येथे जायला निघाले होते. ते या मार्गाने जात असतांना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर नादुरुस्त ट्रक उभा होता. हा ट्रक कार चालकाला दिसला नाही. ट्रक जवळ येताच कार चालकाने दुसऱ्या लेनमधून गाडी घेण्यासाठी वळवली असत यावेळी त्यांची गाडी समृद्धी महामार्गावर सुरक्षा कठड्याला कार धडकली. धडकेनंतर कार पलटी होऊन अपघात झाला. अपघातात कौस्तुभ मुळे हा जागीच ठार झाला. तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये