ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स
नवले पुलावर अपघातांचं सत्र सुरूच; आणखी एक मोठा अपघात!

पुणे | पुण्यातील नवले पुल येथे नेहमी अपघातांचं सत्र सुरूचं असतं. आता पुन्हा एकदा नवले पुलावार अपघात झाला आहे. कात्रज देहू बाह्यमार्गावर नवले पुलाजवळ एक सिमेंट काँक्रिटचा मिक्सर कारवर आदळला. कात्रजकडून नवले पुलाकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात झाला आहे.
कात्रज देहू बाह्यमार्गावर नवले पुलाजवळ सकाळी साडे अकराच्या सुमारास रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी झाला आहे. सिमेंटचा मिक्सर चारचाकीवर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या अपघातात २ जण जखमी झाले असून चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसंच सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील झाली. यादरम्यान भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.