अदानींचा सिमेंट सेक्टरमध्ये दबदबा कायम! ‘या’ मोठ्या कंपनीसोबत सौदा केला पक्का
Gautam Adani – गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सिमेंट सेक्टरमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. अदानी समुहानं (Adani Group) आता मोठ्या सिमेंट कंपनीसोबत सौदा पक्का केला आहे. गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) या कंपनीच्या वतीनं संघी सिमेंटचं अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या (Sanghi Industries) प्रोमोटर्सकडून 56.74 टक्के स्टेक घेण्यात येणार आहे.
गौतम अदानी यांच्या कंपनीनं आठवड्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी शेअर बाजार सुरू होण्याआधी हा मोठा करार केल्याचं जाहीर केलं. वृत्तानुसार, अंबुजा सिमेंटची ही डील 5000 कोटी रूपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यमध्ये झाली आहे. तर आता अंबुजा सिमेंट प्रमोटर समूह रवी सांघी अँड फॅमिलीकडून संघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे.
या डीलबाबत गौतम अदानी यांनी सांगितलं की, या डीलमुळे अंबुजा सिमेंटची प्रतिमा बाजारपेठेत उंचावणार आहे. आम्ही या अधिग्रहणातून सिमेंट क्षमता 2028 पर्यंत दुप्पट करू. तसंच आता कंपनी सिमेंट उत्पादनात 140 एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.