ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

बदनामीकारक मजकूर प्रकरणी कारवाई करणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई | Devendra Fadnavis – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत दिली.

ज्या ट्वीटर हॅंडलवरून हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्वीटर इंडियाशी तीनवेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संबंधिताची माहिती मिळवून त्याला अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अशाप्रकारची बदनामी कदापिही खपवून घेतली जाणार नाही. शासनाने याबाबत तत्काळ पावले उचलत असा मजकूर टाकणाऱ्या ट्वीटर हॅंडलचालकाचा पत्ता मिळण्याबाबत ट्वीटरला पत्रव्यवहार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये