“आम्ही तुमच्या शब्दावर मतं दिली काम…”, अजित पवारांविरोधात उघड नाराजी अडवला!

मुंबई : (Activists On Ajit Pawar) महाराष्ट्रातील राजकारणात मागील पंधरा दिवसात खूप मोठ्या घडामोडी घडल्या. त्यांतर राज्यात सत्तापालट झाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं निवडणुक आयोगानं ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका तात्पुरत्या प्रलंबित केल्या आहेत.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांमधल्या निवडणुकांची देखील रणधुमाळी यानिमित्तानं पहायला मिळणार आहे. काही दिवसात अहमदनगरमधल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवणुका लवकरच होणार असून त्यासाठी सर्वच पॅनलकडून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. यामध्ये स्थानिक राजकारणात वेगळी समीकरणं समोर येऊ लागली आहेत.
शुक्रवार दि. १५ रोजी अहमदनगरमध्ये प्रचारासाठी गेलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा स्थानिक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यावेळी अजित पवारांसमोरच विरोधी पॅनलच्या मधुकर पिचड यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सीताराम गायकर भाजपामध्ये गेले. विधानसभा निवडणुकांचा प्रचार करताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुका होऊ द्या गायकरांचं धोतरच फेडतो, अशा आशयाचं विधान केल्याचं सांगितलं जातं.
आता पुन्हा एकदा समीकरणं बदलली असून सीताराम गायकरांची घरवापसी झाली आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते परतले आहेत. यामुळं गायकरांचं धोतरच फेडतो, या शब्दाची आठवण कार्यकर्त्यांनी पवार यांना करुन दिली आहे.