सिनेसृष्टीत शोककळा! ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

मुंबई | Jayant Sawarkar Passed Away – मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
जयंत सावरकर हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तसंच ते 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर आज जयंत सावरकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
जयंत सावरकर यांनी गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये 30 हून अधिक अजरामर भूमिका साकारल्या आहेत. तर त्यांनी शंभरहून अधिक मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे.