Nitin Gadkari: रूपेरी पडद्यावर उलगडणार नितीन गडकरींचा जीवनप्रवास; ‘हा’ अभिनेता साकारणार गडकरींची भूमिका
मुंबई | Nitin Gadkari – लवकरच केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ‘गडकरी’ (Gadkari) असं चित्रपटाचं नाव असून सध्या या चित्रपटाचं पोस्टर चांगलंच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. तर आता गडकरींची भूमिका साकारणारा अभिनेता समोर आला आहे.
‘गडकरी’ चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरा उभा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नितीन गडकरींची भूमिका कोणता अभिनेता साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. तर आता या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.
अखेर ‘गडकरी’ या चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? याबाबत खुलासा झाला आहे. अभिनेता राहुल चोपडा (Rahul Chopda) हा नितीन गडकरींची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं असून यामध्ये राहुल चोपडाचा पहिला लूकही समोर आला आहे.
सध्या राहुल चोपडाचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे. तसंच आता प्रदर्शित झालेलं हे नवीन पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, येत्या 27 ऑक्टोबरला ‘गडकरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी केलं आहे. तर अक्षय अनंत देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.