ताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई | मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली. वेलकम टू जंगल सिनेमाच्या चित्रीकरणानंतर ४७ वर्षीय श्रेयस तळपदे घरी आला. त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही समजतं आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेले असता त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजलं. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समजत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये