ताज्या बातम्यामनोरंजन

“अजून प्रवास मोठा आहे पण…”, अभिनेता सुबोध भावेची पोस्ट चर्चेत

मुंबई | Subhodh Bhave’s Post In Discussion – अभिनेता सुबोध भावे हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तसंच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जाते. सुबोध भावेनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. नुकतंच सुबोध भावेच्या निर्मिती संस्थेची पहिली वेबसीरिजच्या शूटींगचा पहिला टप्पा संपला आहे. यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या वेबसीरिजमधील टीमचा फोटो शेअर केला आहे. याला त्याने हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

“‘कान्हाज मॅजिक’ या आमच्या निर्मिती संस्थेची पहिली वेब सीरिज. आणि या पहिल्या वेब सीरिजचा शूटिंगचा पहिला टप्पा आज संपला. 22 मे पासून पुणे, भोर, वाई आणि परत पुणे अस सलग 57 दिवस संपूर्ण टीम न थांबता, न थकता, अविश्रांत मेहेनत घेऊन काम करत होती. अजून प्रवास मोठा आहे पण पहिला टप्पा आज गाठला. पुन्हा सप्टेंबर मध्ये शूट चालू होईल आणि मग खऱ्या अर्थाने या वेब सीरिजचं शूट संपेल. यात कोण दिग्दर्शन करतय, कोण काम करतय हे सगळंच तुमच्या समोर येईल. माझ्या संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार. कधी एकदा ही वेब सीरिज तुमच्या समोर घेऊन येतोय असं झालंय. पुन्हा पुढच्या बातमीसह लवकरच भेटू,” असं सुबोधनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये