बाबो! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे सहा मुलांची आई? मुलाखतीत स्वत:च केला खुलासा
मुंबई | Neha Pendse – मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच नेहा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असेत. आताही तिनं एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
नेहानं 2020मध्ये शार्दुलसोबत लग्नगाठ बांधली. सध्या ती तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. तसंच नुकतंच तिनं प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नेहानं तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.
नेहाला मुलाखतीत “तू सहा मुलांची आई आहेस? असं आम्ही ऐकलं आहे” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नेहा म्हणाली की, “हो, मी सहा मुलांची आई आहे. ही सहा मुलं म्हणजे माझ्याकडे सहा कुत्री आहेत. मला आणि माझ्या नवऱ्याला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. आधीच त्यांच्याकडे चार कुत्रे होते. तसंच आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही दोन पुन्हा घेतले.”
“आमची ही सहा मुलं आमचं आयुष्य आहेत. त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. मी घरी एकटी असताना माझ्या आजूबाजूला कोणतीच व्यक्ती येऊ शकत नाही. कारण मी त्यांच्याबरोबर सुरक्षित असते”. नेहानं दिलेलं हे उत्तर चाहत्यांचा चांगलंच आवडलं आहे. यावर नेटकऱ्यांनी तिचं कौतुकही केलं आहे. तसंच तिच्या या उत्तरातून तिचं पाळीव प्राण्यांवर किती प्रेम आहे हे दिसून येतंय.