प्रसिद्ध अभिनेत्री मोहम्मद शमीच्या पडली प्रेमात; थेट लग्नाची मागणी घातली अन् ठेवली ‘ही’ अट
Mohammad Shami | सध्या सर्वत्र वर्ल्ड कप 2023 चा (World Cup 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. तर या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सुरूवातीपासून दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू चांगलेच चर्चेत आहेत. यामध्ये स्टार फलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
मोहम्मद शमीच्या उत्कृष्ट फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याची अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोहम्मद शमी चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. शमीला एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेट लग्नाची मागणी घातली आहे. सोबतच या अभिनेत्रीने एक अटक देखील ठेवली आहे.
मोहम्मद शमीला प्रपोज करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) आहे. पायलने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये तिनं म्हटलं होतं की, शमी तू तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पायलचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.
तर आता पायलनं पुन्हा एक ट्विट केलं आहे. ज्यात तिनं लिहिलं आहे की, मोहम्मद शमी उपांत्य फेरीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुला माझ्याकडून काही मदत हवी आहे का. आम्हाला पहिलं फायनलमध्ये जागा मिळवायची आहे. तसंच तू हिरो व्हावं अशी माझी इच्छा आहे. दरम्यान, पायलंच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.