ताज्या बातम्यामनोरंजन

“हिच ती वेळ…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

मुंबई | Sonalee Kulkarni’s Post In Discussion – मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीचा नुकताच एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’ असं तिच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. सध्या या चित्रपटातील ‘रंग लागला’ हे गाणं सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. त्यासोबतच तिच्यावर चित्रीत झालेली गरमा गरम, कडक लक्ष्मी ही गाणी देखील हिट ठरताना दिसत आहे. तसंच नुकतंच सोनाली कुलकर्णीने याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे. ‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या 15 जुलैपासून संगीतप्रेमींसाठी सादर होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं आगाऊ बुकींग सुरु झालं आहे. यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत देखील आहे.

सोनाली कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तमाशा लाईव्हचे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे कलाकार पाहायला मिळत आहे. “हीच ती वेळ, हाच तो क्षण, ‘तमाशा LIVE’ ची Advance Booking सुरु !”, असं सोनाली कुलकर्णीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तिचे हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये