‘हल्ल्यावर शोक व्यक्त करणारी लोकं ढोंगी’, स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईन समर्थन
Swara Bhaskar on Israel Palestine Conflict : अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ती विवादात अडकलेली सापडते. सध्या ती चर्चेत असण्याचे कारण म्हणजे इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Crisis) यांच्यात सुरु असलेले युद्ध. इस्राइलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन-इस्त्राइल भागातील परिस्थीती खुपच वाईट झाली आहे. दोन्ही बाजूंच्या सुमारे 1000 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1590 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करने पॅलेस्टिनीचे समर्थन करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने आपल्या स्टोरीत लिहिलं की, जेव्हा इस्त्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला, जेव्हा इस्त्राइलने पॅलेस्टिनी लोकांची घरं उद्ध्वस्त केली, ती काबीज केली. पॅलेस्टाईनची मुले आणि किशोरवयीन मुलींना देखील नाही सोडलं. जवळपास 10 वर्षे सतत गाझावर हल्ले आणि बॉम्बस्फोट केले, तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. म्हणून मला इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक करणारे लोक ढोंगी वाटतात. इतकेच नाही तर स्वराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक लोकांच्या पोस्टही शेअर केल्या आहेत.