ताज्या बातम्यामनोरंजन

“अभिनेत्री लोकप्रियता मिळवण्यासाठी…”; ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वादग्रस्त विधान!

मुंबई | Director Geetha Krishna Controversial Statement | सिनेसृष्टीतील (Film Industry) दुसरी काळी बाजू नेहमी सर्वांसमोर उघड झाली आहे. बॅालीवूडपासून (Bollywood) ते टॅालीवूडपर्यंत (Tollywood) अनेक अभिनेत्रींनी (Actress) इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक गुपिते उघड केली आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टींग काउचबद्दल (Casting Couch) देखील त्यांनी खुलासे केले आहेत. त्याचबरोबर आता दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक गीता कृष्णा (Director Geetha Krishna) यांनी नुकतंच कास्टींग काउचसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली असून गाती कृष्णा हे त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.

दिग्दर्शक गीता कृष्णा यांचा एका मुलाखतीमधील (Interview) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते कास्टींग काउचसंदर्भात सांगत आहेत. त्यांनी करिअरच्या सुरवातीपासून त्यांच्या कारकिर्दीत काही बदल पाहीले आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते उत्तर देताना म्हणाले, “हो पाहिलं आहे. अनेक अभिनेत्री लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतात. जे पूर्वी तसं नव्हतं. अनेक अभिनेत्री हा शॅार्टकट मार्ग स्वीकारण्यात मागे हटत नाहीत.”

गीता कृष्णा पुढे म्हणाले, “आजच्या काळात परिस्थिती अशी झाली आहे की फिल्म सिनेइंडस्ट्रीतील कास्टींग काउचने हनी ट्रापचे रुप धारण केले आहे. आता आभिनेत्री चांगले चित्रपट मिळवण्यासाठी आणि झटपट नाव कमावण्यासाठी चित्रपट निर्मात्यांसमोर स्वत:ला स्वाधीन करतात, जे हनी ट्रॅपसारखे (Honey Trap) आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये