अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

अदानी एंटरप्रायझेस प्रकरणाची होणार चौकशी?चौकशीसाठी जेपीसी स्थापन करणार..

नवी दिल्ली : (Adani Enterprises Inquiry) अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises Inquiry) प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) (JPC) स्थापन करण्यात यावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात केली.

अदानींसह विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, लोकांचे हित आणि एलआयसी, एसबीआयची गुंतवणूक लक्षात घेऊन आम्ही चर्चा करू इच्छित आहोत.

अदानी एंटरप्रायझेसची चौकशी जेपीसी स्थापन करून करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली त्याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत खर्गे म्हणाले की, एकदा चौकशी झाली की, अहवाल लोकांसमोर ठेवला पाहिजे जेणेकरून पारदर्शकता येईल आणि लोकांचा विश्वास असेल की त्यांचे पैसे वाचतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये