ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना ‘दे धक्का’

पुणे : (Adhalrao Patil join To Eknath Shinde Group) शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोमवार दि. 18 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव पाटील यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील यांच्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्याकरिणी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवडही केली. त्यामुळे आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याचे आता समोर आलं आहे. मंगळवार दि. 19 रोजी सकाळी तातडीनं त्यांनी समर्थकांची बैठक बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वी सामनामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. त्यानंतर मात्र तातडीनं हालचाली करत त्यांची हकालपट्टी मागे घेण्यात आली होती. माझी शिवसेनेत काय किंमत आहे, हे मला आता समजलं आहे. आतमधून मी अस्वस्थ आहे. येत्या काही दिवसांतच पुढच्या निर्णयाबाबत विचार केला जाईल, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. अखेर आज ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये