ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“गद्दारांसाठी शिवसेनेची दारं अजूनही खुली, पण…”

मुंबई : (Aditya Thackeray On Rebel Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. सेनेचे ५५ पैकी ४० आमदार शिंदे गटात गेले आहेत. तर अजूनही काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाठोपाठ खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे. त्यात शेवाळेंनी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गुरुवार दि. ०७ रोजी शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यावेळी ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दारं उघडे आहेत, पण गद्दार हे गद्दार असतात अशी जोरदार टीका त्यांनी बंड केलेल्या आमदारांवर केली. एकएक करून सगळेच शिवसेना सोडताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभुमीवर शिवसेनेनं पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या बैठकांचे सत्र चालू केले आहे.

पुढे बोलतान ते म्हणाले, शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत, पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे अदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये