ताज्या बातम्यारणधुमाळी

“जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत, लवकरच…” आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

मुंबई | Aaditya Thackeray On Eknath Shinde’s Group – युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे ज्यांना जबरदस्तीनं पळवून नेलं आहे, त्यांना परत यायचंय आणि दुसरा असा की ज्यांच्या राक्षसी महत्त्वकांक्षा होत्या, असा हल्ला आदित्य ठाकरेंनी केला आहे.

ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत ते लवकरच समोर येतील. काही जणांच्या राक्षसी महत्त्वकांक्षा आहेत मात्र काहींना जबरदस्ती नेलंय. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आदित्य ठाकरेंनी म्हणाले.

पुढे आदित्य म्हणाले, पोटदुखी हीच की ठाकरे परिवारातलं कुणीतरी विधीमंडळात आलं. आतापर्यंत आपण बाहेर जे करतोय ते आधी मातोश्रीवर कळत नव्हतं, आता कळतंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये