ताज्या बातम्यादेश - विदेश
अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं; 14 जणांचा मृत्यू, 78 लोक जखमी
हेरात | Afganistan – अफगाणिस्तान (Afganistan) भूकंपानं (Earthquake) हादरलं आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 78 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अफगाणिस्तानमध्ये झालेला हा भूकंप मोठा आहे. या भूकंपामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 78 लोक हे जखमी झाले असल्याचे वृत्त ‘न्यूज एजन्सी एएफपी’नं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. तर आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये आता भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.