ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…नाहीतर चंद्रकांत पाटलांनंतर तुमच्यावरही शाईफेक करू”, भीम आर्मीचा शिंदे-फडणवीसांना संतप्त इशारा

सोलापूर | Solapur News : सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. रविवारी भीम आर्मीचे (Bhim Army) अध्यक्ष अजय महिंद्रकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली होती. त्यामुळे महिंद्रकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यापार्श्वभूमीवर आता भीम आर्मी आक्रमक झाली आहे. भीम आर्मीनं आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त इशारा दिला आहे. अजय महिंद्रकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्या नाहीतर येत्या काळात खाजगीकरणाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाईफेक करण्यात येईल, अशा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्यानंतर पोलिसांकडून अजय महिंद्रकर यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांपासून अजय महिंद्रकरांच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केला आहे.

तसंच तातडीनं कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्या नाहीतर चंद्रकांत पाटलांनंतर तुमच्यावरही शाईफेक करू, अशा संतप्त इशारा अशोक कांबळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. त्यामुळे आता या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये