कोल्हापूरनंतर गौतमीला सिंधुदुर्गातही नो एन्ट्री; जाणून घ्या नेमकं कारण काय?
कोल्हापूर | Gautami Patil – प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा चाहतावर्गही लाखेंच्या संख्येत आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात तरूणांची लाखोंच्या संख्येनं गर्दी पाहायला मिळते. पण काहीवेळा तिच्या कार्यक्रमांमध्ये गोंळत, हाणामारीचे प्रकार होत असल्यामुळे तिच्या कार्यक्रमांना विरोध दर्शवला जातो. तर काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये गौतमीचा कार्यक्रम होणार होता. पण कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळामुळे कोल्हापूरमध्ये तिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यानंतर आता गौतमीला सिंधुदुर्गातही नो एन्ट्री आहे.
सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 7 आणि 8 ऑक्टोबरला तिचा कार्यक्रम होणार होता. मात्र, तिच्या कार्यक्रमाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी तांत्रिक कारण देत गौतमीचा कार्यक्रम रद्द केला आहे.
कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये सकाळी अकरा वाजरा गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर कणकवलीमध्ये सायंकाळी पाच वाजता वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे तिचा कार्यक्रम होणार होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे गौतमीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये 22 आणि 24 सप्टेंबरला गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण गणेशोत्सव काळात गौतमीच्या कार्यक्रमासाठी आवश्यक असा पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्यामुळे तिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.