प्रतिकात्मक लग्न साखरपुडा वाढदिवस करून आंदोलन
छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील पुणे मनपाचे प्रभाग क्र ७ मधील सावित्रीबाई सांस्कृतिक हॉल जो नागरिकांना विविध कार्यक्रमांस उपलब्ध असायचा त्या हॉल मध्ये केलेलता चुकीच्या विकास कामासंदर्भात प्रतिनिधिक स्वरूपात उपायुक्त श्री सपकाळ साहेब क्र ३ घोले रोड यांच्या ऑफिस मध्ये स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आज मंगळवार दिनांक १३ रोजी प्रतिकात्मक लग्नाचा कार्यक्रम करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग अध्यक्ष विनायक कोतकर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे, कामगार उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, सुनील लॉयरे, विशाल पवार, उदय गडकरी, मयूर बोलाडे, आयुष् बोबडे, आकाश धोत्रे, गौरव खेडेकर, विजय बोरकर, मिलन भोरडे, स्वप्नील अळकुंटे, राजू धोत्रे, आकाश डोंगरे, कैलास धोत्रे,केतन इरकल,रवी कुसाळकर आदी मनसेननिक उपस्थित होते