आष्टी रेल्वेगाडीला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
अहमदगनर | अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आष्टी रेल्वेला भीषण आग (Railway Fire) लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आष्टी रेल्वेला आग लागल्यामुळे रेल्वेचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. तर सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रेल्वेला आग लागताच सर्व प्रवाशांना गाडीबाहेर सुखरूप काढण्यात आलं. त्यामुळे या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीमध्ये रेल्वेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर ही आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सध्या करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/reel/CydT27WN01j/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==