प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड; पहा काय आहे नेमकं प्रकरण
Air India – काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात वायरल होत होता. एअर इंडियाच्या विमानात एका प्रवासी महिलेच्या अंगावर एका व्यक्तीने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्याप्रकरणी आता वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर विमानाच्या पायलटचे लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच विमानाच्या डायरेक्टरला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणारा आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी 42 दिवसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच एअर इंडियाने शंकर मिश्राला चार महिन्याची बंदी घातली होती.
काय आहे नेमकं प्रकरण
अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद व्यक्तीने एका 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली. ज्येष्ठ महिलेने या संदर्भात केबिन क्रू ला माहिती दिली असता त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची चौकशी महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर सुरु झाली. महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला, त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. क्रू मेंबरकडून देखील घेण्यात आली नाही. मला क्रू मेंबरकडून प्रतिसाद उशिरा मिळाला. लघुशंका केल्यामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.