ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

पुण्यातून गोवा, सिंधुदुर्गसाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा

पुणे येथून गोवा आणि सिंधुदुर्गसाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरु होत आहे. शनिवारी आणि रविवारी दोनच दिवस ही सेवा असणार आहे. गोव्यातील विमान कंपनी फ्लाय ९१ तर्फे ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

उत्तर गोव्यातील मोप येथील विमानतळावरून सकाळी ६.१५ वाजता पुण्याला जाणारे विमान सुटेल. हे विमान सकाळी ७.४० वाजता पुणे येथे पोहोचेल. पुणे येथून तेच विमान सकाळी १०.५५ वाजता गोव्यासाठी सुटेल.

सिंधुदुर्गसाठी पुणे येथून सकाळी ८.०५ वाजता विमान निघेल. ते सकाळी ९.१० वाजता सिंधुदुर्ग येथे पोहोचेल. त्यानंतर तेच विमान सकाळी ९.३० वाजता पुण्यासाठी सुटेल. ते पुणे येथे सकाळी १०.३५ वाजता पोहोचेल.

पुणे जिल्ह्यातून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे. त्यात शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी ही विमानसेवा असल्याने सुट्टीच्या दिवशी गोवा सफरीचा आनंद देखील घेता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये