ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

“करण तूच माझा दुश्मन होतास”; काजोलबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजय थेट बोलला, अनेकांच्या भूवया उंचावल्या

Ajay devgan On karan johar : करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण 8 (Koffee With Karan 8) हा कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Koffee With Karan 8 Promo) या प्रोमोत अजय देवगन (Ajay Devgn) हा करण जोहरच्या प्रश्नांना हटके उत्तर देताना दिसत आहे.

करणनं अजयला प्रश्न विचारला,”तू पार्टीला का जात नाहीस?” यावर अजय म्हणतो, “कारण मला कोणी फोन करुन बोलवत नाही.” यानंतर करण अजयला विचारतो,”पापाराझी तुझे फोटो एअरपोर्टवर क्लिक का नाही करत? याला उत्तर देताना अजय म्हणतो,”कारण मी त्याला फोन करुन बोलवत नाही.”

पुढे करण अजयला विचारतो, काजोल तुझ्याशी बोलत नसेल तर त्याचं कारण काय असतं? या प्रश्नाचं अजय हसत उत्तर देतो, “मी त्याच दिवसाची वाट पाहत आहे, जेव्हा ती माझ्याशी बोलणार नाही” करण अजयला विचारतो,”इंडस्ट्रीत तुझा दुश्मन आहे का?”. या प्रश्नाचं अजय उत्तर देतो, “होय, एकेकाळी तूच माझा दुश्मन होतास”

कॉफी विथ करण 8 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, रोहित शेट्टी म्हणतो, “चित्रपट हिट असो वा फ्लॉप, अजय आणि सलमान खान हे त्यांच्या व्हॅनमध्ये चील करत असतात.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये