ताज्या बातम्यामनोरंजन

अजय पुरकर यांनी सांगितला ‘सुभेदार’च्या शूटींगदरम्यानचा खास किस्सा; म्हणाले, “हे शिवधनुष्य पेलताना…”

मुंबई | Ajay Purkar – सध्या मराठी ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत आहेत. आत्तापर्यंत पावनखिंड, फर्जद, शेर शिवराज, फत्तेशिकस्त हे ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तर आता ‘सुभेदार’ (Subhedar) हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं जोरदार कमाई केली आहे. तर सुभेदार चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. तर आता अजय पुरकर यांनी या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा खास किस्सा सांगितला आहे.

अजय पुरकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. तसंच ही पोस्ट शेअर करत अजय पुरकर यांनी ‘सुभेदार’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे.

अजय पुरकर यांनी ही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “जय शिवराय …श्री शिवराज अष्टक अर्ध्यावर येऊन आता पाचवा चित्रपट देखील मराठी माणसांनी साजरा केला आहे. सुभेदार सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू आहे. सर्व शिवभक्त आणि रसिकांचे खूप खूप आभार.

हे शिवधनुष्य पेलताना अनेक लोकांचा हातभार लागतो. सुभेदारच्या चित्रीकरणादरम्यान माझ्या पायाला बऱ्यापैकी गंभीर दुखापत झाली होती. पण अशा वेळेस माझ्यासाठी कायम आधार असतो तो म्हणजे डॉ. चेतन प्रधान आणि त्यांची पत्नी फिजिओथेरेपिस्ट डॉ. श्रद्धा प्रधान ह्यांचा.

ह्या वेळेस अजून एक मित्र मिळाले. अद्भूत कौशल्य असलेले प्लास्टिक सर्जन डॉ. कौस्तुभ शेंडे ह्यांच्या अथक परिश्रमानंतर एक महिन्यात माझा पाय पूर्ण बरा झाला आणि चित्रीकरण पूर्ण करू शकलो. सुभेदार चित्रपटाच्या यशामध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे”, अशी पोस्ट अजय यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये