क्रीडा

केकेआरचा ढाण्या वाघ ऐनवेळी एपीएलमधून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएलच्या पंधराव्या सिजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)ची चुरस लागलेली असताना ऐनवेळी केकेआरचा ढाण्या वाघ अजिंक्य राहणे दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर पडला आहे. त्यामुळं केकेआर ची चिंता मोठ्या तर मनात वाढली आहे. तो बाहेर पडला असल्याने आत इथून पुढील सामन्यांत तो दिसणार नाही.

१४ मे रोजी हैदराबादविरोधातील सामन्यात फलंदाजीदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही त्याने फलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात २४ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या होत्या. आता मात्र त्याच्या पायाचा त्रास वाढल्याने त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. अशी माहिती क्रिकट्रॅकर या क्रिकेटविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिली आहे.

केकेआर संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. केकेआरची येत्या १८ मे रोजी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सशी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे लढत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये