क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

‘रणजी ट्रॉफी’ गाजवणाऱ्या अजिंक्य रहाणे चा मोठा निर्णय, BCCI ला वैतागून भारतीय संघाला सोडचिठ्ठी

Ajinkya Rahane to play for Leicestershire : टीम इंडियामधून (Team India) बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यावर्षी काऊंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशरकडून (Leicestershire sign Ajinkya Rahane for 2023 season) खेळताना दिसणार आहे. रहाणेने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये भारताकडून शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. लीसेस्टरशर क्लबतर्फे करण्यात आलेल्या घोषणेनुसार, अजिंक्य रहाणे आयपीएलच्या स्पर्धेनंतर 8 काऊंटी सामने आणि वनडे कपच्या संपूर्ण सत्रासाठी टीमकडून खेळणार आहे.

देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीध्ये अजिंक्य रहाणेचा खेळ चांगला सुरु आहे. त्याने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टेस्ट सामन्यासाठी बीसीसीआय अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबईकडून खेळताना आणि टीमचं नेतृत्व सांभाळताना अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) जवळपास प्रत्येक सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने 204 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर देखील त्याच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पहायला मिळाला.

आतापर्यंत 6 सामन्यामध्ये त्याने 11 डावांमध्ये उत्तम सरासरीने 634 रन्स केले आहे. यामध्ये एक द्विशतक आणि एका 191 रन्सच्या खेळाची समावेश आहे. आसामच्या टीमविरूद्ध त्याने हा उत्तम खेळ केला होता. शिवाय दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ही त्याने अर्धशतक झळकावलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये