“स्टॅम्प पेपर द्या, मी लिहून देतो की, महाविकास आघाडी…”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Ajit Pawar – मागील काही दिवसांपासून राज्यात पुढीव वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून बहुमत मिळवत सत्ता राखण्याचे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याच्या भूमिका मांडल्या जात आहेत. मात्र, मविआतील काही नेतेमंडळींनी एकत्र निवडणुका लढण्याबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. अशातच आज (23 मे) यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? यासंदर्भात संभ्रम असताना अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली आहे. पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं यांसदर्भात अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले, “स्टॅम्प पेपर आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी 100 टक्के एकत्र राहणार आहे.”
“आम्हाला आमचं मत मांडण्याचा आधिकार आहे. महाविकास आघाडीची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नका”, असंही अजित पवार म्हणाले.