ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांनी व्यक्त केली शंका; म्हणाले…

पुणे | Pune Bypoll Election – पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीवर (Bypoll Election) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही पोटनिवडणूक (Bypoll Election) बिनविरोध होईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. ते आज (21 जानेवारी) पुण्यात (Pune) बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, आज मी दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच भाजपकडून शंकर जगताप किंवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवलं आहे. तर कसबा विधानसभेसाठी भाजपची काही नावं पुढे आली आहेत. यामध्ये दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. भाजप त्यांचा निर्णय घेतील आम्ही त्यात नाक खुपसणं गरजेचं नाही. मात्र, दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक (Bypoll Election) बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढणार आहे. हा निर्णय पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमुखाने घेतला आहे. त्यामुळे आज शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. तसंच जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर चिंचवड शहरातील काही नावांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये नाना काटे (Nana Kate) आणि भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांच्या नावांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये