ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अजित पवारांचा बाल्लेकिल्ल्या खालसा? चिंचवडचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला..

पि. चिंचवड : (Ajit Pawar Group Leader Join NCP) काही महिन्यापुर्वी अजित पवार यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. त्यानंतर पक्षाचे नाव अन् चिन्हाबरोबरच काका-पुतण्यामध्ये वर्चेस्वाची लढाई सुरु झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दोन्ही गटाकडून नेते अन् कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत त्यातच आता अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात अजित पवार यांचा प्रभाव मोठा आहे. नुकतेच अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्रीपद देखील देण्यात आले आहे. यादरम्यान आज पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर आझम पानसरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आझम पानसरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळं आझम पानसरे लवकरच शरद पवारांना पाठिंबा दर्शवतील असा दावा केला जात आहे. या भेटीवेळी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान आझम पानसरेंनी जर शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल असे मानले जात आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवार यांचा बालेकिल्ला खालसा होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये