पिंपरी चिंचवड
अजित पवारांनी उद्या बोलावली पक्षाची बैठक
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाला सोडचिट्टी (पिंपरी) दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील पक्ष संघटनेतील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्या (गुरुवारी) तातडीची बैठक बोलविली आहे. अजितदादा ऍक्शन मोडवर आले असून उद्या नवीन शहराध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
पुण्यातील सर्किट हाऊस येथे सकाळी आठ वाजता ही बैठक होणार आहे. पक्ष संघटना टिकविण्यासाठी, पडझड रोखण्यासाठी माजी नगरसेवकांची बैठक बोलविली आहे.
पक्ष संघटना टिकविणे, पक्षातील पदाधिका-यांनी पक्ष सोडून जाऊ नये याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नवीन शहराध्यक्ष निवडण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शाम लांडे हे शहराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.