ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
“गृहमंत्री व्हायला आवडलं असतं”, वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना “मला गृहमंत्री व्हायला आवडलं असतं, पण मिळालं नाही. आता काय करता,” असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा रंगली. याबाबत माध्यमांनी थेट यांनाच विचारणा केली.
यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं होतं,” असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. ते शुक्रवारी (२४ सप्टेंबर) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “माझे कार्यकर्ते सारखे म्हणत होते की गृहमंत्रीपद तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे. म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं की मलाही पाहिजे होतं, पण नाही मिळालं. आता काय करता.” असं मत त्यांनी यावेळी मांडलं.