शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना; अमित शहांची भेट घेण्याची शक्यता
Ajit Pawar | शुक्रवारी पुण्यात (Pune) शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे एकत्र आले होते. हे तिघं प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. प्रतापराव पवार हे शरद पवारांचे बंधू आहेत. प्रतापरांवांच्या पत्नीची प्रकृती बरी नाहीये. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले.
अशातच आता या तिघांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार पुण्याहून थेट दिल्लीला रवाना झाल्याचं समजतंय. तसंच ते दिल्लीला गेल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.