ताज्या बातम्यारणधुमाळी

“तुम्ही दारू पिता का?” अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले, “सहज बोलून…”

मुंबई | Ajit Pawar On Abdul Sattar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर (Abdul Sattar) हल्लाबोल केला आहे. अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना “तुम्ही दारू पिता का?” अशी विचारणा केली होती. यासंदर्भात अजित पवारांनी सत्तारांना खडेबोल सुनावले. तसंच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. ते आज (15 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघांनाही वेगवेगळ्या भेटीत सांगितलं होतं की, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलं आहे. ते काहीही बोलतात. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं हा त्या त्या पक्षांचा अधिकार आहे. त्यात मला टीपण्णी करण्याचं कारण नाही पण मंत्रिमंडळातील सहकारीच ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमाही खराब होत आहे.”

“लोक ऐकून घेतात, पाहतात आणि लक्षात ठेवत असतात. हे दुरूस्त केलं पाहिजे. काहीजण सहज बोलून जातात ते सर्वांनी पाहिलं आहे. आपण बोलताना कोणाला चहा पाहिजे असेल तर चहा घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या, काॅफी पाहिजे असेल तर काॅफी घ्या. कोणी काहीच घेत नसेल तर दुध घ्या. तुम्ही दारू पिता का? असं आपण विचारत नाही. मात्र, मंत्र्यांची असं बोलण्यापर्यंत मजल गेली आहे”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये