ताज्या बातम्यापुणेरणधुमाळीसिटी अपडेट्स

“वाह रे पठ्ठ्या…”, चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार कडाडले

पुणे | Ajit Pawar On Chandrakant Patil – सध्या भाजप नेते, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. वाह रे पठ्ठ्या..आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली, असं म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो. त्या काळात ‘कमवा आणि शिका’ ही योजना भाऊराव पाटील यांनी सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, हा भाऊराव पाटील यांचा विचार होता.”

“काही लोकांनी त्या काळात कर्मवीरांना शाळेसाठी जमिनी दिल्या होत्या. तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या होत्या. याचा अर्थ त्यांनी भीक मागितली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली का? कुठले शब्द कसे वापरायचे? यांचं भान राखलं पाहिजे. अरे तुम्ही पुण्यासारख्या ‘विद्येचं माहेरघर’ असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात,” असंही अजित पवार म्हणाले.

पुढे ते कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांना उद्देशून म्हणाले की, “ही जी भाषा वापरली जातेय ही बदलण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला घरी पाठवायचं आणि कुणाला शेती बघायला लावायची हे तुमच्या हातात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाच्या अधिकाराअंतर्गत हा अधिकार तुम्हाला दिला आहे”, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये