ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

फडणवीसांच्या “तीन वर्षे स्थगितीतच वाया गेले” टीकेला पवारांचं प्रत्युत्तर म्हणाले; “अरे निधी कुणाच्या बापाच्या…”,

पुणे : (Ajit Pawar On Devendra Fadnavis) एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेली अशी टीका केली. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही वेळातच “तीन वर्षे स्थगितीतच वाया गेले” फडणवीसांना टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी अरे निधी कुणाच्या बापाच्या घरच्या आहे का? असा सवालच त्यांना उपस्थित केला आहे. यावेळी ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान पवार पुढे म्हणाले, “आयला ते कर्नाटकवाले सारखे शिव्या घालत आहेत, आपल्या गाड्या फोडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले मी बैठक घेतो, तर बोम्मई म्हणाले की, मी बैठकीलाच येणार नाही. तसेच एक इंचही जागा सोडणार नाही. अरे चर्चेतून मार्ग निघतो ना” असं अजित पवार यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला या सरकारच्या काळात फार तर परिणामकारक दोन वर्षे मिळणार आहेत. तीन वर्षे निर्णय न घेणं, निर्णय थांबवणं, स्थगिती देणं यातच जवळपास वाया गेलीत. त्यामुळे आता ट्वेंटी-२० ची मॅच खेळल्याशिवाय पर्याय नाही. केवळ ट्वेंटी-२० चा सामना खेळावा लागणार नाही, तर त्यात शतकही झळकावं लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये