“राक्षसी महत्त्वकांक्षा योग्य नाही”; अजित पवारांचा शिंदेंवर हल्लाबोल

शिर्डी : (Ajit Pawar On Eknath Shinde) शुक्रवारी ४ नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत, असा गंभीर आरोपही केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत. ते नेते तसे बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं हे ही जनतेला रुचलेलं नाही.
जनतेचा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड राग आहे. बच्चू कडू यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून पद मिळवले ते ठीक आहे, परंतु पक्षावर दावा करणे योग्य नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा योग्य नाही,” अशी टीका अजित पवारांनी केली.