देश - विदेश

अजित पवार म्हणाले; शेतकरी जगला तर राज्य जगेल, मुख्यमंत्री म्हणाले; हे सरकार…”

मुंबई : (Ajit Pawar On Eknath Shinde) मागील आठवड्यात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला. त्यामुळे शेती पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुसकान झालं आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मुद्दावरुन विरोधकांनी सध्या सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भुमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना सतत होणाऱ्या नुकसानीवर राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत गांभीर्यानं घेतलं पाहिजे. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर राज्य आणि देश जगेल हे विसरता कामा नये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील सरकारनं अतिशय तुटपुंजी मदत केली असल्याचे मत, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या या भावनिक मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अवकाळी पावसाच्या संदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे, त्या ठिकाणी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिले असून त्याचे अहवाल ते पाठवत आहेत. आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

कालपासून काही ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे, त्याठिकाणचे देखील पंचनामे सुरु आहेत. सगळे नियम डावलून आपण यापुर्वीही शेतकऱ्यांना मदत केली आहे. यावेळीही मदत करणार आहोत. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्याचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना सरकारची काय मदत मिळणार हे पाहाणं महत्तावाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये