महाराष्ट्र

“महाविकास आघाडीत थोडेबहुत मतभेद आहेत मात्र… ” अजित पवार

सातारा : महाविकास आघाडीतील पक्षांत काही मतभेत आहेत पण ते खूप तुरळक आहेत. भांड्याला भांडे लागणारच अशी स्थिती आहे. मात्र राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडी भक्कम आहे. असं स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोयनानगर मध्ये पत्रकार परिषदेत ते बोल्त होते.

यावेळी राज्याचे सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, “‘कोयना धरणाला आता साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या काळात पुनर्वसन कायदे नव्हते, त्यामुळं या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांवर अन्याय झाला. मात्र, आता लवकरात-लवकर त्यांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेऊन मागणी केली पाहिजे. अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन यासाठी जास्तीत-जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

दरम्यान ते असही म्हणाले कि, कोयना धरण पायथ्याशी असणाऱ्या नव्या चाळीस मेगावॉट क्षमतेच्या वीजगृहाचे काम बंद आहे. लवकरच ऊर्जा व जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हे कामही पुढं नेलं जाईल. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा टंचाई आहे, जलविद्युत प्रकल्प सोयीस्कर आहेत. राज्याला भविष्यात सौरऊर्जा प्रकल्पांवर ज्यादा लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. त्यामुळं स्वस्त दरात वीजनिर्मिती होईल. यासाठी मोठ-मोठे उद्योगपती, मोठे ग्रुप पुढे येत असल्याने यातूनच चांगले प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याची सरकारची इच्छा आहे. बरोबरच कोयना प्रकल्पातील मागे पडलेली काम इलेकर उरण करून महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पर्यटन वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये