अजित पवारचं ‘मिशन’ शिंदे-फडणवीस सरकारचा पर्दाफाश!

शिर्डी : (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government) वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस यासारखे 4 ते 5 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. ज्याच्यातून अंदाजे 2 हजार कोटींची गुंतवणूक आणि 3 लाख रोजगार निर्माण होऊ शकला असता. मात्र, यातील तीन प्रकल्प गुजरातला गेल्याने तरुणांच्या हातचा रोजगार सरकारने हिरावून घेतला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने राज्याच राजकारण तापलं आहे.
दरम्यान, या वादात आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उडी घेतल्याचे दिसून येत आहे. नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारने ७५ हजार जागांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. यावरू आता पवार यांनी मोठी दावा केला आहे. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन हे शिर्डीत होत आहे. या अधिवेशनात सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखीनच पेटणार असल्याचे दिसून येत आहे. माञ, अजित पवारांकडे असे कागदपत्र आहेत ज्याद्वारे ते प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले हे सिद्ध करू शकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावेळी पवार म्हणाले, “राज्यातून उद्योग बाहेर गेल्यामुळे शिंदे-फडणवीसांना त्यांचंच मन खायला उठलं आहे. हे सरकार 75 हजारांच्या भरती प्रक्रियेतून जनतेची दिशाभूल करत आहे. माझ्याकडे सगळं सविस्तर आहे. मी शिर्डीच्या अधिवेशनात सगळं बाहेर काढून यांचा पर्दाफाश करणार आहे,” असा दावा अजित पवार यांनी केला आहे.