“…नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन”, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं

पुणे | Ajit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये मग भाषणं असो किंवा माध्यमं, कार्यकर्ते असो अजित पवार हे त्यांच्या खुमासदार शैलीत बोलताना दिसतातच. आताही अजित दादा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता तर दादांनी थेट कार्यकर्त्यांनाच भर बैठकीत सुनावलं आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, लोकांना पदं दिली आहेत त्यामुळे पदासाठी भांडायचं नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन. बाकी काही नाही करणार. या सगळ्यातून तुमची बदनामी होत नसून पवार साहेबांची होत आहे. हा कोणता फाजिलपणा सुरू आहे? असा सवालही अजित दादांनी उपस्थित केला.
पदाचा राजीनामा घेणार आणि मी फार टोकाचं वागेन. तुम्ही एकदा पदाधिकारी झाला की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात, असंही अजित पवार म्हणाले.